पिंपरी : शहरातील सुस्थितीतील रस्ते तोडून प्रशस्त पदपथ, सायकल मार्ग तयार केले जात आहेत. कोट्यवधींचा खर्च करून तयार केलेले पदपथ विक्रेते, दुकानदारांच्या साहित्यांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे पदपथांना अतिक्रमणांनी विळखा घातला असून, पादचाऱ्यांना सेवा रस्त्यावरूनच चालावे लागत असल्याचे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात रस्ते, पदपथ विकसित करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी सुस्थितीतील रस्ते तोडून नव्याने तयार केले जात आहेत. अधिक रुंदीचे पदपथ बनवून सायकल मार्गाची भर घातली जात आहे. मात्र, हे पदपथ, सायकल मार्ग एकसलग नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांडपाणी वाहिनीचे झाकण, पदपथावरील झाडे, वीजेचे खांब, बाके, कठडा, नामफलक असे अडथळे पार करीत ये-जा करताना पादचाऱ्यांना अक्षरश: अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही

हेही वाचा >>> भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या, हडपसर भागातील घटना

अनेक पदपथांवर दुकानदार, विक्रेते आणि वाहनचालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या पदपथांचा उद्देश सफल होत नसल्याचे चित्र आहे.

पदपथ आणि सायकल मार्गांवर झालेला खर्च

दापोडी ते पिंपरी (दोन्ही बाजू)- १०९ कोटी

पिंपरी ते निगडी (एक बाजू)- ६० कोटी

निगडी ते पिंपरी (एक बाजू)- ६० कोटी

टेल्को रोड-लांडेवाडी ते थरमॅक्स चौक – १६० कोटी

बिर्ला रुग्णालय ते डांगे चौक- १९ कोटी

डांगे चौक ते कस्तुरी चौक- १५ कोटी

शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक- ५५ कोटी

सांगवी ते किवळे- ९० कोटी

नव्या संकल्पनेमुळे पादचारी, सायकलस्वारांना सुरक्षित मार्ग मिळणार आहे. त्यामुळे पायी, सायकलने ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. वायू, ध्वनिप्रदूषणात घट होणार आहे. पदपथावरील अतिक्रमणे क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून हटवली जातात. प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता, स्थापत्य प्रकल्प विभाग.