पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एलबीटी नोंदणीला व्यापाऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास ३१ हजाराची नोंदणी अपेक्षित असताना तीन महिन्यानंतरही अवघे चार हजार नोंदणी झाली आहे. आणखी जेमतेम एक हजार व्यापारी नोंदणी करतील, असा विश्वास प्रशासनाला आहे. अशाप्रकारे एलबीटी न भरण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे पालिकेला मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
राज्यशासनाच्या आदेशानुसार एक एप्रिलपासून एलबीटी लागू करण्यात आली. तथापि, सुरूवातीपासून व्यापाऱ्यांनी एलबीटीला तीव्र विरोध दर्शवला आहे. खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी फेडरेशनने केलेले आंदोलन व एलबीटी भरू नका, असे सातत्याने आवाहन केल्याचा परिणाम म्हणून शहरात अपेक्षित नोंदणी झालेली नाही. पालिकेने ईमेल, एसएमएसच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, व्यापाऱ्यांकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही. पिंपरीत ‘व्हॅट’ची (मूल्यवर्धित कर) २५,०२५ इतकी नोंदणी झाली आहे. त्यापैकी १२, ३६२ जणांनी ‘यूजर आयडी’ घेतला असून १२, ६६३ जणांनी तो घेतलेला नाही. त्यामुळे नोंदणी न करण्याबरोबरच एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. तथापि, त्याविरोधात ठोस कारवाई करण्याच्या मनस्थितीत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी सध्यातरी नाहीत, असे दिसते.
यासंदर्भात, एलबीटीचे प्रमुख अशोक मुंढे म्हणाले, नोंदणी कमी झाली असली तरी एकूण वातावरण पाहता हे प्रमाण समाधानकारक आहे. एलबीटी नोंदणी न करणारे व व्हॅटची नोंदणी असूनही ‘यूजर आयडी’ न घेणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती एकत्रित करण्यात येत आहे. यापूर्वी जकात असताना ते किती रक्कम भरत होते, याची माहिती घेतली जात आहे. पालिकेकडे यासंदर्भात सविस्तर माहिती उपलब्ध आहे. कर बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी नोंदणी करून पैसे भरावे तसेच ‘व्हॅट’ नोंदणीधारकांनी यूजर आयडी घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पिंपरीत एलबीटी नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एलबीटी नोंदणीला व्यापाऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती पुढे आली आहे. अशाप्रकारे एलबीटी न भरण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे पालिकेला मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-07-2013 at 02:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No response for registration of lbt in pimpri