‘स्थानिक संस्था करा’ विरोधात (एलबीटी) व्यापाऱ्यांच्या लाक्षणिक बंदच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी पुण्यातील बाजारपेठांत शुकशुकाट होता. मात्र अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंबरोबर काही ठिकाणी किराणा दुकानेही सुरू असल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहिले. एरवीही सोमवारी बाजारपेठ बंदच राहात असल्याने व्यापाऱ्यांच्या बंदचा खरा परिणाम उद्याच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
शहरातील औषध दुकाने, पेट्रोल पंप, भाजी तसेच दूध विक्री दुकाने बंदमध्ये सहभागी नसल्याने नागरिकांच्या रोजच्या व्यवहारांवर परिणाम झाला नाही. उपाहारगृहे, स्नॅक्स सेंटर्स, ब्रँडेड कपडय़ांची दुकाने, मॉल्सही बंदमध्ये सहभागी नव्हती. शहरात काही ठिकाणी किराणा मालाची दुकानेही सुरू होती. सराफी दुकाने तसेच कापड दुकाने बंद असल्यामुळे लक्ष्मी रत्यावर शुकशुकाट होता. मात्र, दर सोमवारी लक्ष्मी रस्त्यावर हेच चित्र दिसत असल्याने बंदचा खरा परिणाम उद्याच कळेल, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत होती. यापूर्वी व्यापाऱ्यांनी १ एप्रिलनंतर पुकारलेल्या सहा दिवसांच्या बंदच्या काळात शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात केलेल्या निवेदनाविषयी त्वरित अध्यादेश निघावा आणि एलबीटी कायद्यामध्ये आणखी दुरुस्त्या करण्यात याव्यात अशा व्यापाऱ्यांच्या मागण्या आहेत. ७ मे पर्यंत अध्यादेश निघाला नाही तर ८ मे पासून पुन्हा बेमुदत बंद पुकारण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.

Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
women prostitution, Nagpur, husband Nagpur,
देहव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडत ती पुन्हा संसारात रमली
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
Important observations in the hearing letter of the National Green Tribunal regarding development works by blocking drains
नाले बंदिस्त करून विकासकामे करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना चपराक; राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या सुनावणी पत्रात महत्वाची निरीक्षणे
sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’!
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
e vehicle prices will remain under control even without subsidy says nitin gadkari
अनुदानाविनाही ई-वाहनांच्या किमती आटोक्यात राहतील -गडकरी