‘मालेगावचे शोले’ चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पिंपरी-चिंचवड शहरातील तरूणांनी एकत्र येऊन ‘फ्रेंडशिप बी अलर्ट’ हा चित्रपट बनविला, त्यासाठी आवश्यक चित्रीकरण स्थळे, कलावंत व अन्य सामग्री शहरातूनच उपलब्ध करण्यात आली. बऱ्याच अडीअडचणींवर मात करून तयार झालेला हा चित्रपट २६ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आणि आता चित्रपटगृहेच मिळत नसल्याची मोठी अडचण तरूणाईसमोर उभी राहिली.
चित्रपटाचे निर्माते दीपक चव्हाण, दिग्दर्शक करण तांदळे यांच्यासह संपूर्ण टीमने बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबतचे अनुभव कथन केले. मोहन लांडगे, विनिता संचेती, राहुल म्हेत्रे, प्रेम नरसाळे, सुशील सोनवणे, नीलम सणस, ज्योती बोराटे, पूजा भागवत, सचिन भट, करिष्मा वाबळे आदी शहरातील कलावंत या चित्रपटाद्वारे आपले भवितव्य आजमावत आहेत. याशिवाय, पडद्यामागे अनेक तंत्रज्ञ आहेत, तेही शहरातील आहेत. वाल्हेकरवाडीसह शहरातील विविध भागात चित्रीकरण करण्यात आले असून त्यासाठी गावक ऱ्यांनी सहकार्य केले आहे. ‘पोस्ट प्रॉडक्शन’चे कामही येथे पार पडले. शहरातील कलावंतांना संधी मिळावी, या हेतूने त्यांना संधी दिल्याचे चव्हाण यांनी या वेळी सांगितले. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत, त्यात आमीर खानचा ‘पीके’ प्रदर्शित होत असल्याने चित्रपटगृहांची मारामार अनुभवास येत असल्याने मिळेल तिथे आणि शक्य होईल तिथे चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार असल्याची कैफियत त्यांनी मांडली.
‘फ्रेंडशिप’च्या उत्साहाला चित्रपटगृहांचा अडथळा
पिंपरी-चिंचवड शहरातील तरूणांनी एकत्र येऊन ‘फ्रेंडशिप बी अलर्ट’ हा चित्रपट बनविला,पण आता चित्रपटगृहेच मिळत नसल्याची मोठी अडचण तरूणाईसमोर उभी राहिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-12-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No theatre available to release frienship movie