शहरातील मध्यवर्ती भागातील पेठांचा परिसरवगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा हा दुरुस्तीच्या नावाखाली येत्या गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेने अघोषित पाणीकपातीला सुरुवात केली आहे. शुक्रवारी (५ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

यंदा धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने पाणी काटकसरीने वापरण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे. महापालिकेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार अघोषित पाणीकपातीला सुरुवात करण्यात आली आहे. वारजे जलकेंद्र आणि त्या अंतर्गत चांदणी चौक, गांधीभवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे राॅ पंपिंग, जुने वारजे केंद्र, एसएनडीटी टाकी, कोंढवा-धावडे जलकेंद्र आणि राॅ वाॅटर पंपिंग, वडगाव जलकेंद्रासह त्याअंतर्गत केदारेश्वर पंपिंग, आगम पंपिंग, श्रीहरी पंपिंग, भामा-आसखेड, तसेच नवीन लष्कर जलकेंद्र, रामटेकडी आणि खराडी टाकी परिसर येथे येत्या गुरुवारी (४ एप्रिल) स्थापत्य आणि विद्युतविषयक तातडीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पेठावगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (५ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!
Loksatta explained The quality of coal in power generation plants is deteriorating
विश्लेषण: वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशाचा दर्जा खालावतो आहे?
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

हेही वाचा >>> बसस्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या १,६२० चालकांवर कारवाई, पीएमपी, आरटीओची मोहीम

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :

पाषाण, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, बावधन परिसर, उजवी आणि डावी भुसारी काॅलनी, चिंतामणी सोसायटी, पाषाण, परमहंसनगर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, सूस रस्ता, कुंभारवाडी टाकी, सिप्ला फाउंडेशन, रेणुकानगर, हिल व्ह्यू सोसायटी, पॉप्युलरनगर, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाउनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, कांचन गंगा, अलकनंदा सोसायटी, सहजानंद, किर्लोस्कर कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, पुणे-मुंबई बाह्यवळणाच्या दोन्ही बाजू, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर गावठाण, गोसावी वस्ती, बाणेर, बालेवाडी, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपाॅईंट रस्ता, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर, कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम, सोसायटी, शाहू काॅलनी, वारजे जकात नाका, गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, कोथरूड, वडार वस्ती, हॅपी काॅलनी, डहाणूकर काॅलनी, सुतारदरा, किष्किंधानगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, आयडीयल काॅलनी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, वैदूवाडी, भोसलेनगर, खैरेवाडी, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, हनुमाननगर, जनवाडी, संगमवाडी, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, गोकुळनगर पठार या भागाचा पाणीपुरठा बंद राहणार आहे. तसेच हिंगणे, आनंदनगर, माणिकबाग, दामोदरनगर, विश्रांतीनगर, वडगाव बुद्रुक, मीनाश्री पुरम, कात्रज आगम मंदिर परिसर, बालाजीनगर, दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोषनगगर, दत्तनगर, आंबेगाव रस्ता, सुखसागरनगर, धनकवडी, आंबेगाव पठार, संतोषनगर, जांभूळवाडी रस्ता, धनकवडी गावठाण परिसरा, तळजाई परिसर, सहकारनगर भाग १ आणि २, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, सुखसागरनगर भाग १ आणि २, कात्रज-कोंढवा रस्ता, गोकुळनगर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकर नगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, खडी मशिन परिसर, लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी, खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, थिटे वस्ती, तुकारामनगर, चंदननगर, रामटेकडी, सय्यदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, साडेसतरा नळी, महंमदवाडी, हांडेवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची, खडकी, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर या भागाचा पाणीपुरठा बंद राहणार आहे.