यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष्य लागलं होते. या मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होती. मात्र, याठिकाणी खरी लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातच असल्याचं बोललं जात होतं, या लढाईत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा एका लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला. दरम्यान, या पराभवानंतर आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी पुढे आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – अजित पवारांच्या कुंडलीत शनीची साडेसाती, सुनेत्रा पवारांना झटका? बारामतीत सुप्रिया सुळे विजयी पथावर, नेमकं काय घडलं?

नेमकी कोणी केली मागणी?

पुण्यातील काटेवाडीतील काही ग्रामस्थ आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अजित पवार यांना पत्रदेखील लिहिलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

यासंदर्भात बोलताना, “काटेवाडीचे उपसरपंच मिलींद काटे म्हणाले, सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवून त्यांना केंद्रीय मंत्री मिळावं, असा ठराव आम्ही पारीत केला आहे. अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. यासंदर्भात आम्ही अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. तसेच यासाठी सह्यांची मोहीम देखील सुरु करण्यात आली आहे.”

याशिवाय अन्य एक ग्रामस्थ वंदना काटे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “सुनेत्रा पवार यांनी निर्मल ग्राम आणि स्वच्छतेविषयी तसेच पर्यावरणाच्या क्षेत्रात मोठं काम केलं आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रीय मंत्रीपद द्यावं, अशी मागणी आमच्या गावातील सर्व महिलांनी केली आहे”, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर ४८ तासांच्या आत अजित पवारांचा मोठा निर्णय, युगेंद्र पवारांना पहिला झटका

सुप्रिया सुळेंनी केला होता सुनेत्रा पवारांचा पराभव

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा पराभव केला होता. सुप्रिया सुळे यांना ७.३२ लाख मतं मिळाली होती. तर सुनेत्रा पवार यांना ५.७३ हजार मतं मिळाली होती. सुप्रिया सुळे यांनी १.५९ लाख मतांनी विजय मिळवला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nominate sunetra pawar for rajya sabha demand raised by pune katewadi villege people to ajit pawar spb