शहरात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ९३ गुन्ह्य़ांत दोषी ठरल्यामुळे प्रथमवर्ग न्यायालयाने तीनशे तीन वर्षे शिक्षा सुनावली. ही शिक्षा प्रत्येक गुन्ह्य़ात सुनावल्यामुळे ती स्वतंत्र भोगावी लागणार होती. पण, तीनशे वर्षे शिक्षा एक व्यक्ती कशी भोगणार. त्यामुळे आरोपीने सत्र न्यायालयात शिक्षा कमी करून देण्याची मागणी केली. ती मान्य करत आता त्या चोरटय़ाला आता सात वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे.
दयानंद रवी शेट्टी (वय ५२, रा. मोहननगर, चिंचवड) असे त्या चोरटय़ाचे नाव आहे. त्याच्यावर शहरात विविध ठिकाणी दीडशे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला १४ जानेवारी २००७ रोजी अटक करण्यात आली. त्या वेळी घरफोडीच्या गुन्ह्य़ातील १५ किलो सोने त्याच्याकडून जप्त करण्यात आले. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर खटला चालला. त्याला एकूण ९३ गुन्हे सिद्ध झाले. त्यामध्ये न्यायालयाने ३०३ वर्षे आणि ४१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा वेगळी भोगावी लागणार होती. त्यामुळे शेट्टी याने अॅड. बी. ए. अलुर मार्फत सत्र न्यायालयात शिक्षा कमी करण्यासाठी अर्ज केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. उपासने यांनी ही शिक्षा कमी करून शेट्टी सात वर्षे आणि ४१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, अशी माहिती अॅड. अलुर यांनी दिली.
चोरटय़ाची तीनशे वर्षांची शिक्षा आली केवळ सात वर्षांवर!
शहरात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ९३ गुन्ह्य़ांत दोषी ठरल्यामुळे प्रथमवर्ग न्यायालयाने तीनशे तीन वर्षे शिक्षा सुनावली. ही शिक्षा प्रत्येक गुन्ह्य़ात सुनावल्यामुळे ती स्वतंत्र भोगावी लागणार होती.
First published on: 30-05-2013 at 02:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not 300 years only 7 years pumping for theft