पुणे : यंदा वाङ्मय पुरस्कारांच्या पुस्तक निवड प्रक्रियेच्या छाननी समितीचे सदस्य प्रा. नरेंद्र पाठक, आर्या आपटे, अरविंद दौडे होते. या समितीने पुस्तकांची एकमताने शिफारस केली. पुरस्कार जाहीर झाल्यावर समिती सदस्य नरेंद्र पाठक यांनी कोबाड गांधी यांच्या पुस्तकावर आक्षेप घेऊन तक्रार केली. त्यानंतर सरकारने निर्णय घेतल्याचा खुलासा साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी केला. या प्रक्रियेत साहित्य संस्कृती मंडळाची काहीही चूक नाही. पुरस्कार रद्द शासनाने केला. मला राजीनामा देण्याची गरज नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> समाजमाध्यमावर चंद्रकांत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत ध्वनिचित्रफीत, कोथरुड पोलिसांकडून गुन्हा दाखल

मी शासनाचाच जबाबदार घटक असल्याने शासनाच्या निर्णयावर भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. छाननी समितीने शिफारस केल्यानंतर पुरस्कारासाठीची अनुवादासाठीच्या पुस्तकाची शिफारस गणेश विसपुते यांनी केली. त्यानुसार पुरस्कार जाहीर झाला होता, अशी माहिती डॉ मोरे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not resign nothing wrong sahitya sanskriti mandal dr sadanand more pune print news ccp 14 ysh