Pune District Vidhan Sabha seats : पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघामधून ३०३ उमेदवारांनी निवडणुकीच्या माध्यमातून जनमताचा कौल आजमावला. मात्र, ४७ हजार ६८५ मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारले असल्याचे मतमोजणीमध्ये स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या पराभवाची मते ‘नोटा’इतकी असल्याचे दिसून आले आहे.

पुणे शहरात आठ, पिंपरी चिंचवडमध्ये तीन आणि उर्वरीत ग्रामीण भागात दहा असे एकूण २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून महायुती, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहूजन समाज पक्ष आणि इतर प्रादेशिक, स्थानिक पक्ष आणि अपक्ष असे ३०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी
mhada lottery 2024 konkan board extend application deadline for 2264 homes
म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२४ : २२६४ घरांच्या सोडतीला अखेर १५ दिवसांची मुदतवाढ, २५ डिसेंबरपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया

हेही वाचा…Kothrud Vidhan sabha Result : कोथरूड मतदारसंघामध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील यांना ‘बाहेरचा’ उमेदवार शिक्का पुसण्यात यश

h

चिंचवड मतदारसंघातून सर्वाधिक २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्याच मतदारसंघात सर्वाधिक चार हजार ३१६ मतदारांनी ‘वरीलपैकी कोणीही नाही’ (नोटा) पर्याय निवडला आहेे. त्यापाठोपाठ शहरातील वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक चार हजार २३७ मतदारांनी नोटा पर्याय निवडला आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे टिंगरे अवघ्या चार हजार ७१० मतांनी पराभूत झाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोथरूड मतदारसंघातून तीन हजार मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केल्याचे मतमोजणीनंतर समोर आले आहे. कोथरूडमधून राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवाजीनगरमधून भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवाजीनगर मतदारसंघातून दोन हजार मतदरांनी एकही उमेदवार पसंत नसल्याने ‘नोटा’ला मतदान केले आहे.

ग्रामीण भागातील जुन्नर विधानसभा मतदारसंघात १३७६ मतदारांनी ‘नोटा’ पर्यायावर विश्वास दाखविला. आंबेगाव ११५७, खेड-आळंदी १६९२, शिरूर २१५७, दौंड १२११, इंदापूर ६३४, बारामती ७७९, पुरंदर १४८४, भोर २७२० आणि मावळ विधानसभा मतदारसंघात २७१५ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा…Khadakwasla Vidhan Sabha Result : खडकवासल्यात मनसेची मते निर्णायक

मतदारसंघातील ‘नोटा’ला झालेले मतदान

जुन्नर – १३७६, आंबेगाव – ११५७, खेड आळंदी – १६९२, शिरूर – २१५७, दौंड – १२११इंदापूर – ६३४, बारामती – ७७९, पुरंदर – १४८४, भोर -२७२०, मावळ – २७१५, चिंचवड – ४३१६, पिंपरी – ४०१३, भोसरी – २६८५, वडगाव शेरी – ४२३७, शिवाजीनगर – २०४४, कोथरूड – ३१५२, खडकवासला – २९००, पर्वती – २४६१, हडपसर – २९४६, पुणे कॅन्टोन्मेंट – १७९३, कसबा – १२१३

Story img Loader