पुणे जिल्हा न्यायालयाच्या रजिस्ट्रारने जारी केलेल्या एका कथित नोटीसमुळे वाद निर्माण झाला आहे. या नोटीसमध्ये महिला वकिलांना ‘न्यायालयात केस बांधू नये, यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो’ अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे बार असोसिएशनने आपल्या कार्यालयाला अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी ट्विटरला नोटीसचा फोटो शेअर केला होता. “वाह..हे पाहा! महिला वकिलांमुळे कोण विचलित होत आहे आणि का?”. फोटोनुसार ही नोटीस २० ऑक्टोबरला जारी करण्यात आली आहे.

नोटीसमध्ये काय लिहिलं आहे?

‘महिला वकील न्यायालयामध्ये अनेकदा आपले केस बांधत असल्याचं किंवा वेणी घालत असल्याचं निदर्शनास आलं असून, यामुळे न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे महिला वकिलांना यापुढे हे करणं टाळावं अशी सूचना करण्यात येत आहे’, असं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे यांनी आपल्या कार्यालयाला अशी कोणतीही नोटीस प्राप्त झाली नसल्याचं सांगितलं आहे. मात्र बार अँच बेंच वेबसाईटने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आक्षेप घेण्यात आल्यानंतर शनिवारी ही नोटीस मागे घेण्यात आली.

पांडुरंग थोरवे यांनी सांगितलं की “आमच्या कार्यालयाला नमूद तारखेला कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. नियमानुसार, वकिलांशी संबंधित सर्व नोटीस पुणे बार असोसिएशनकडे पाठवल्या जातात. हे प्रकरण माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी न्यायालय परिसरात आलो आणि ज्या ठिकाणी नोटीस लावलेली असू शकते अशा सर्व जागांची पाहणी कली. पण मला कुठेही अशी नोटीस दिसली नाही”. आम्ही याप्रकरणी अधिक माहिती घेत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notice for women lawyers not to fix their hair in court created controversy in pune sgy