मेट्रो स्टील कार्पोरेशन या कंपनीने मागील तीन वर्षांत आयात केलेल्या १०५ कोटींच्या मालावर जकात भरली नसल्याचा ठपका ठेवून िपपरी पालिकेने जकात व दंड मिळून २१ कोटी ६१ लाख रुपये भरण्याची नोटीस कंपनीला बजावली आहे.
मुख्य जकात अधीक्षक अशोक मुंढे यांनी ही माहिती दिली. २००९ ते १२ या कालावधीत कंपनीने किती विक्रीकर भरला, याची माहिती मुंढे यांनी विक्रीकर कार्यालयाकडून मागावून घेतली होती. त्यानुसार १०५ कोटींचा माल कंपनीने आयात केल्याचे निदर्शनास आले. त्यावर जकात भरली असल्यास पुरावे सादर करण्याची सूचना पालिकेने कंपनीला केली होती. मात्र, कंपनीकडून पुरावे देण्यात आले नाहीत. त्यामुळे जकात व दहापट दंडाची रक्कम भरण्याची नोटीस पालिकेने कंपनीला बजावली आहे, असे मुंढे यांनी सांगितले. या प्रकरणी कंपनीची बाजू समजू शकली नाही.