पिंपरी : मालमत्ताकर थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर आले आहेत. अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या ४१ हजार ३०७ जणांना जप्ती नोटीसा तर ३६ हजार ७१९ मालमत्ता धारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ता धारकांकडे ६७१ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. या मालमत्ता धारकांना आजपासून दोन टक्के विलंब शुल्क लागू होणार आहे. मालमत्ता जप्तीची मोहीम हाती घेणार असल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सहा लाख सात हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. कर संकलन व कर आकारणी विभागाने चालू आर्थिक वर्षात ५८० कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत तीन लाख ६६ हजार ६३६ मालमत्ता धारकांनी म्हणजेच ६० टक्के नागरिकांनी विविध सवलतींचा लाभ घेत कराचा भरणा केला.

हेही वाचा – पुणे : पीएमपीची आता कॅशलेस तिकीट सुविधा; सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार

कर भरण्यात निवासी मालमत्ताधारक आघाडीवर असून तीन लाख २२ हजार ७५८ निवासी मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला. २९ हजार ७७८ बिगर निवासी, आठ हजार ३९१ मिश्र, दोन हजार ७८७ औद्योगिक तर दोन हजार ८७५ मोकळ्या जमीन असणाऱ्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. वाकड, सांगवी, चिंचवड, थेरगाव विभागातील कर भरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जनजागृती, जप्ती मोहीम, थकबाकीदारांना नोटीसा, नळजोड बंद करणे, महिला बचत गटांच्या माध्यमातून देयकांचे पूर्ण झालेले वाटप, रिल्स स्पर्धा, समाजमाध्यमांचा प्रभावी वापर याचा कर वसुलीसाठी फायदा झाला.

हेही वाचा – पुण्यातील धरणांमध्ये ९७.४१ टक्के पाणीसाठा; खडकवासला धरणातील विसर्ग कायम

पहिल्या सहामाहीत ६० टक्के मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. आता उर्वरित ४० टक्के मालमत्ता धारकांकडून कर संकलनासाठी लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर आणि चालू कर शंभर टक्के वसुली करण्याचे ध्येय असणार आहे. यासाठी मालमत्ता जप्त करण्यासारखा कटू निर्णय घ्यावा लागला आहे. – नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व करसंकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notices to 41 thousand people of pimpri chinchwad mnc for property tax arrears this action will take place pune print news ggy 03 ssb