‘‘येणाऱ्या काळामध्ये विज्ञान आणि समाज दोन्हींपुढे अधिक मोठी आव्हाने असणार आहेत, त्यासाठी अधिक संशोधक लागणार आहेत. त्यासाठी मुलांना संशोधनामध्ये रस निर्माण होईल असे पोषक वातावरण लहानपणापासून मिळणे गरजेचे आहे, तरच मुलांवर संशोधनाचे संस्कार होतील,’’ असे मत डॉ. अनिल काकोडकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये डॉ. काकोडकर बोलत होते. या वेळी होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनच्या संचालक डॉ. जयश्री रामदास, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे संचालक मुस्तानसिर बरमा, स्पर्धेचे सचिव चँग, स्पर्धेचे राष्ट्रीय समन्वयक विजय सिंग, निमंत्रक परेश जोशी आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. काकोडकर म्हणाले, ‘‘संशोधन हेच प्रगतीचे मूळ आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून संशोधन वृत्ती जोपासली गेली पाहिजे. सायन्स ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अधिक विस्तारित होण्यास मदत होते. विज्ञानाची गोडी लागण्याबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. आजचे बालवैज्ञानिक हेच आपले भविष्य आहे. हे बालवैज्ञानिक भविष्यात उत्तम कामगिरी करतील.’’ या स्पर्धेमुळे मुलांना विविध देशांतील संस्कृतीची ओळख होण्यास आणि विश्वातील संवाद वाढण्यास मदत होत आहे, असे मत बरमा यांनी व्यक्त केले.
संशोधनामध्ये रस निर्माण होण्यासाठी मुलांना लहानपाणापासून पोषक वातावरण हवे- काकोडकर
डॉ. काकोडकर म्हणाले, ‘‘संशोधन हेच प्रगतीचे मूळ आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून संशोधन वृत्ती जोपासली गेली पाहिजे.
First published on: 05-12-2013 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nourish research tendency within students from childhood only dr kakodkar