पुणे: महाराष्ट्रसह देशातील बहुतांश भागात नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान सरासरीच्या बरोबरीने किंवा सरासरीपुढे राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नोव्हेंबरची थंडी आटोक्यातच राहणार आहे. डिसेंबरपासून मात्र थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचाही अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आता चार आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

 भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत नोव्हेंबरमधील देशातील तापमान आणि पावसाबाबतची माहिती दिली दिली. दक्षिण भारतात सध्या ईशान्य मोसमी पाऊस पडत आहे. तो सरासरीपेक्षा १२३ टक्के जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभर नोव्हेबरमध्ये सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस जास्त राहिल. या काळात ढगाळ वातावरण राहिल्याने थंडीचा कडका कमी जाणवेल. केवळ हिमालयीन भाग, पूर्वोत्तर राज्यात थंडीचे प्रमाण अधिक राहणार आहे. दिवसाचे कमल तापमान सरासरीखाली राहणार असल्याने उन्हाचा चटकाही कमी असेल.

हेही वाचा >>> पुणे: राज्यात ‘राहुल गांधीं’च्या दोन जाहीर सभा; ‘भारत जोडो’ यात्रेत पुण्यातील ११५० पदाधिकारी होणार सहभागी

 बंगालच्या उपसागरात अधूनमधून वाऱ्यांची चक्रीय स्थिती राहील. त्यातून कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत. परिणामी महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात हलका पाऊस पडेल. त्यामुळे नोव्हेबरमध्ये किमान तापमानत मोठी घट होणार नाही. नोव्हेबर अखेर पावसाळी स्थिती दूर झाल्यानंतर डिसेंबरपासून थंडीचा कडाका वाढत जाईल. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत थंडी राहू शकेल या दरम्यान अल्प पावसाची शक्यताही राहील. मात्र, त्याबाबतचे अंदाज वेळोवेळी जाहीर केले जातील, असे डॉ. महापात्रा यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू

थंडीवर पावसाचा परिणाम

गेल्या काही वर्षांपासून नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास लांबतो आहे. ही बाब लक्षात घेऊन हवामान विभागाने पावसाच्या परतीच्या प्रवासाच्या नियोजित तारखा बदलल्या आहेत. मात्र, पाऊस या तारखांपेक्षाही पुढे जातो आहे. दक्षिणेतील ईशान्य मोसमी पाऊसही आता उशिराने सुरू झाला आहे. या सर्वांचा परिणाम थंडीवर आणि तिच्या कालावधीवर होतो आहे. याबाबतचा सखोल अभ्यास सध्या सुरू असल्याचे डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: November cold under control cloudy with chance light rain pune print news ysh