लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. कामात हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.

हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त करत प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देताच महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे बैठकीला उपस्थित होते.

आणखी वाचा-‘ससून’प्रकरणी कारवाई कुणावर? चौकशी अहवाल अखेर मंत्र्यांच्या हाती

महापालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध माध्यमांतून होणारे वायुप्रदूषण रोखण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. बांधकाम साहित्याची वाहतूक करताना आच्छादन करून वाहनातून ने-आण करावी, वाहनाच्या टायरवर जलफवारणी करूनच वाहने मुख्य रस्त्यावर चालवावीत, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कापडी आच्छादन, लोखंडी मार्गरोधक (बॅरिकेड्स) लावाव्यात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करावी. कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा कामात हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

आणखी वाचा-पुणे : चिमुकल्याची अवेळी जन्मापासून ३ महिने मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी!

१६ विशेष वायु प्रदूषण देखरेख पथके

शहरातील वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच मार्गदर्शक सूचनांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रभागनिहाय विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ३२ प्रभागांमध्ये १६ विशेष वायु प्रदूषण देखरेख पथक तैनात केली जाणार आहेत. या पथकांमध्ये उपअभियंता, स्वच्छता निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि एमएसएफ कर्मचारी यांचा समावेश आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, कचरा जाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यासाठी विशेष पथके तयार करून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. -शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now action is taken against the polluters special teams of the municipal corporation are deployed pune print news ggy 03 mrj
Show comments