समाविष्ट गावांमधील टेकडय़ांवर जैववैविध्य उद्यानाचे (बायोडायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) आरक्षण ठेवण्यासाठी जो निधी लागणार आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देणाऱ्या स्वयंसेवी संस्था आता कोठे आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
समाविष्ट गावांमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक बीडीपीच्या विरोधात सक्रिय झाले असून पक्षाध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे त्यांनी हा मुद्दा नेला आहे. बीडीपीग्रस्त नगरसेवक बीडीपीच्या विरोधात सक्रिय झाल्यामुळे शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही या नगरसेवकांच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, तसेच अजित पवार, सुप्रिया सुळे यांची बीडीपी विरोधकांकडून दिशाभूल होत असल्याची टीका स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.
स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या या टीकेमुळे राष्ट्रवादीमध्ये त्या विरोधात प्रतिक्रिया उमटली असून संस्थांची भूमिका चुकीची असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. बीडीपी आरक्षण असलेली जमीन ताब्यात घेण्यासाठी हजारो कोटी रुपये लागणार आहेत आणि ती रक्कम आम्ही देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थांकडून उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देणाऱ्या स्वयंसेवी संस्था आता कोठे आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादीचे सभागृहनेता सुभाष जगताप यांनी उपस्थित केला आहे. आम्ही काही मत मांडले, तर ती दिशाभूल आणि इतरांनी मांडले की ते योग्य मत, असा चिमटाही त्यांनी संस्थांना काढला.
निधी उपलब्ध करून देणाऱ्या त्या संस्था आता कोठे आहेत?
समाविष्ट गावांमधील टेकडय़ांवर जैववैविध्य उद्यानाचे आरक्षण ठेवण्यासाठी जो निधी लागणार आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देणाऱ्या स्वयंसेवी संस्था आता कोठे आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
First published on: 30-04-2013 at 01:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now ncp leaders asking for voluntary associations about the fund for bdp