पुणे : बागेत खेळणाऱ्या शाळकरी मुलींना मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून त्यांचा पाठलाग करणाऱ्या एकाच्या विरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल लहू कदम (वय ५३, रा. पीएमसी काॅलनी, संभाजीनगर, वाकडेवाडी, मुंबई-पुणे रस्ता) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका मुलीच्या वडिलांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शाळकरी मुलगी आणि तिच्या मैत्रिणी बागेत खेळत होत्या. त्या वेळी कदम बागेत थांबला होता. कदमने मुलींचा पाठलाग करुन त्यांना मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखविली. उद्यानात थांबलेले शेखर साठे यांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर कदम तेथून पसार झाला. साठे यांनी त्याचा पाठलाग केला. कदम पीएमसी वसाहतीत गेल्याचे त्यांनी पाहिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Maharashtra News Live : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

हेही वाचा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रावर कोयत्याने वार;  कर्वेनगर भागातील घटना

दरम्यान, मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी कदमचा शोध घेतला. त्याचा पत्ता शोधून काढला. कदम पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. कदम याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) आणि विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मावकर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obscene act indecency with schoolgirls playing garden crime pune print news ysh