पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमात अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली चाकणकर यांनी समाजमाध्यमात मजकूर प्रसारित केला होता. त्या वेळी ॲड. विजयकुमार साखरे नावाच्या खातेधारकाने अश्लील भाषेत समाजमाध्यमात प्रतिक्रिया नोंदवली. साखरे यांच्यानंतर अश्लील प्रतिक्रियेवर आणखी काही जणांनी प्रतिक्रिया नोंदविल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चाकणकर यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. रुपाली चाकणकर यांच्यासह चित्रा वाघ यांच्याविषयी अश्लील प्रतिक्रिया नोंदवण्यात आली असून त्यांच्या छायाचित्रात छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमात अश्लील मजकूर प्रसारित करणाऱ्या खातेधारक, तसेच खात्याची तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे.