पुणे : संपूर्ण देशात नोव्हेंबर महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रापासून दक्षिण भारतात नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी जाणविण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युजंय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. उत्तर भारत आणि मध्य भारतातही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. पण, देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत उत्तर आणि मध्य भारतात वातावरण थंड असेल. महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज असल्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी कमी जाणवेल.
हेही वाचा – ब्राझीलच्या साखरेचा जगाला दिलासा…जाणून घ्या कसे?
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात देशात आणि दक्षिण भारतात सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज आहे. दक्षिण भारतात नोव्हेंबर महिन्यात सरासरी ११८.७ मिमी आणि देशाच्या अन्य भागांत सरासरी २९.७ मिमी पाऊस पडतो. राज्यात कोकण, दक्षिण महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या अन्य भागांत कोरडे हवामान असेल.
ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीच्या फक्त १९.७ मिमी पाऊस झाला. हा पाऊस प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला आहे. राज्याच्या अन्य भागांत पावसाची नोंद नाही. पावसाने उघडीप दिल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात तापमान चढे राहिले. एल-निनोचा परिणाम हिवाळ्यात दिसून येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल. दक्षिण भारतासह देशाच्या अन्य भागांत सरासरी इतक्या पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.