दत्ता जाधव

पुणे : राज्यभरात ऑक्टोबर हिटच्या झळांनी अंगाची काहिली होत आहे. बुधवारी मुंबईला उष्णतेच्या झळांचा फटका बसला. सातांक्रुजमध्ये सर्वाधिक ३६.४ अंश सेल्शिअसची नोंद झाली आहे. विदर्भात कमाल तापमान सरासरी ३५ अंश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३४ अंश सेल्सिअसवर गेले होते. २५ ऑक्टोबरपर्यंत ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Case against Sarafa, elephant hair jewellery,
हत्तीच्या केसांचे दागिने विकणाऱ्या पुण्यातील सराफाविरुद्ध गुन्हा, वन्यजीव कायद्यान्वये कारवाई
two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर…
RPI Athawale group pune, RPI Athawale,
महायुतीला मतदान न करण्याची कोणी केली प्रतिज्ञा!
snails in freshwater pune
पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?
pune vidhan sabha voter list
मतदारयादीचा भूतकाळातही ‘गोंधळ’
Shrimant Dagdusheth Halwai Ganpati latest news
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य
pune district rebel in mahayuti and mahavikas aghadi
पुणे: जिल्ह्यात नऊ ठिकाणी बंडखोरी; महायुती आणि महाविकास आघाडीसमोर अनुक्रमे पाच व चार ठिकाणी आव्हान
mns raj Thackeray
परस्पर पाठिंबा जाहीर करणाऱ्यांना तंबी, मनसेचा पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
sharad pawar
शरद पवार यांचे बारामतीकडे विशेष लक्ष, आज बारामतीत सहा सभा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील सांताक्रुजमध्ये बुधवारी सर्वाधिक ३६.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. डहाणूत ३४.७, कुलाब्यात ३३.२ अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भात मागील दहा दिवसांपासून पारा सरासरी ३५ अंशांवर आहे. बुधवारी अकोल्यात ३६.२, यवतमाळमध्ये ३५.७, वाशीम, वर्ध्यात ३५.०, ब्रह्मपुरीत (चंद्रपूर) ३५.३ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यात परभणीत ३४.७, नांदेडमध्ये ३४.६ आणि औरंगाबादमध्ये ३३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापुरात ३६, पुणे, सांगलीत ३४.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

आणखी वाचा-औद्योगिक सांडपाण्याची माहिती द्या अन्यथा कारवाई; महापालिकेचा उद्योजकांना इशारा

राज्यातून मोसमी वारे माघारी गेल्यानंतर हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होताना दिसत आहे. ही स्थिती २५ ऑक्टोबरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. यंदा एल-निनोचे वर्ष असल्यामुळे सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होत आहे. हिवाळ्यातही कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

कमी दाबाच्या क्षेत्राचा राज्यावर परिणाम नाही

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांच्याही पश्चिमेकडे बुधवारी तयार झालेले कमी दाब क्षेत्र एका आठवड्यात म्हणजे २१ ऑक्टोबरनंतर विकसित होऊन ओमानच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे. त्याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. बंगालच्या उपसागरात म्यानमारच्या किनारपट्टीवर बुधवारी तयार झालेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचे रुपांतर २१ ऑक्टोबरला कमी दाब क्षेत्रात होऊ शकते. त्यानंतर त्याची दिशा स्पष्ट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजाराची लाच स्वीकारताना सहायक फौजदार जाळ्यात

बिगर मोसमी पाऊस पडेना

यंदा मोसमी वारे माघारी जाताना पाऊस पडला नाही. शिवाय बिगर मोसमी पाऊसही अपेक्षित प्रमाणात झाला नाही. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. २१ सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर येतो. सूर्याला विषुववृत्त ओलांडून जाण्यासाठी ४५ दिवसांचा काळ लागतो. या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात सूर्याची उष्णता जास्त मिळते. निरभ्र आकाश आणि आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे कमाल तापमान वाढते. यंदा २५ ऑक्टोबरपर्यंत ऑक्टोबर हिटचा फटका बसण्याची शक्यता आहे, असे मत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले.