दत्ता जाधव

पुणे : यंदा ऑगस्ट, सप्टेंबर पाठोपाठ ऑक्टोबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भात सर्वाधिक म्हणजे सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअस जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

1327 crore quarterly profit for Mahabank
‘महाबँके’ला १,३२७ कोटींचा तिमाही नफा
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
bmw group india achieves record sales in 2024 sales at 10556 units
जानेवारी-सप्टेंबर नऊमाहीत विक्रमी १०,५५६ बीएमडब्ल्यू वाहनांची विक्री
rain Maharashtra, monsoon Maharashtra,
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात किती पाऊस पडला ? जाणून घ्या, सर्वात कमी, सर्वात जास्त पाऊस कुठे झाला
houses sold Mumbai marathi news
मुंबईतील नऊ हजार ९११ घरांची सप्टेंबरमध्ये विक्री; विक्रीत काहीशी घट, पितृपक्षाचा फटका ?
cyclonic air condition developed over North Maharashtra forming low pressure belt to North Bangladesh
पुण्यात बुधवारी पडलेल्या पावसाने २१ सप्टेंबर १९३८ रोजीचा विक्रम मोडला; जाणून घ्या, सप्टेंबर महिन्यांतील आजवरच्या पावसाची आकडेवारी
Heavy rain Mumbai, rain Mumbai, Mumbai latest news,
मुंबईत सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज
Surya and ketu nakshatra gochar end of September combination
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार बक्कळ पैसा; १११ वर्षांनंतर सूर्य-केतूचा दुर्लभ संयोग, ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकवणार भाग्य

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर या काळात विदर्भासह ओदिशापासून दक्षिणेकडील संपूर्ण पूर्व किनारपट्टी, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना दिल्ली, उत्तर मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. सरासरी ३३ ते ३४ अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या ठिकाणी पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे. विदर्भात सरासरी तापमानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसची सर्वाधिक तापमान वाढ नोंद झाली आहे. तर मराठवाड्यात सरासरी कमाल तापमानापेक्षा १ ते २ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे.

आणखी वाचा-पिंपरी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी तंत्रज्ञान सक्षम होणार; सात शाळांमध्ये ‘कोडिंग’ वर्ग

दरम्यान, तापमान वाढीचा हा कल पुढील दहा दिवस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेबर महिन्यासारखाच ऑक्टोबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण ठरण्याची शक्यता आहे.

अकोल्यात ३७.५ अंश सेल्सिअसची नोंद

गुरुवारी अकोल्यात सर्वाधिक ३७.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. अमरावती, ब्रह्मपुरी (चंद्रपूर) आणि वाशिमध्ये पारा ३६ अंशांवर गेला आहे. विदर्भातील अन्य ठिकाणांसह आणि मराठवाड्यात कमाल तापमान सरासरी ३५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. मध्य महाराष्ट्रात पारा ३३ अंशांवर गेला होता. सांताक्रुज येथे ३४.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.