पुणे : व्याजाने घेतलेले ५० हजार रुपये परत केल्यानंतर महिलेकडे आणखी पैशांची मागणी करणाऱ्या एकाविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा – फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबाॅल सामनादरम्यान हाणामारी; १३ जणांविरुद्ध गुन्हा
हेही वाचा – पुणे : कोंढव्यात घरखर्चास पैसे न दिल्याने पत्नीकडून पतीवर चाकूने वार
भागवत पांडुरंग छत्रे (वय ४८, रा. खांदवेनगर, लोहगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेस पैशांची गरज होती. आरोपी छत्रेकडून तिने दरमहा पाच टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेतले होते. महिला आणि तिच्या पतीने मुद्दल तसेच व्याजापोटी छत्रेला वेळोवेळी अडीच लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर छत्रेने महिला आणि पतीस धमकावण्यास सुरुवात केली. त्याने आणखी ५५ हजारांची मागणी केली. रात्री अपरात्री दूरध्वनी करून त्याने महिलेला शिवीगाळ केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी छत्रे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे तपास करत आहेत.