पुणे प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ दोन दिवसापूर्वी घेतली. त्या घटनेनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असून शरद पवार की अजित पवार यांच्या सोबत जायचं अशा संभ्रम अवस्थेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आहेत. त्याच दरम्यान उद्या शरद पवार आणि अजित पवार यांनी मुंबईत बैठकीचं आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर आपण आता नेमकं कोणासोबत जायचं हे ठरवण्यासाठी राज्यात अनेक भागात राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली आज कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बैठकीनंतर प्रशांत जगताप यांनी पुणे शहराबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. “पुणे जिल्ह्यातील नागरिक शरद पवार यांच्या पाठीशी कायम राहिला असून आज देखील ते त्यांच्या पाठीशी आहे. सध्याची राजकीय घडामोड लक्षात घेऊन आजच्या बैठकीत तीन ठराव करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या पाठीशी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत राहणार आहे. मुंबईत उद्या होणाऱ्या बैठकीला शहरातील ३०० ते ३५० कार्यकर्ते जाणार आहेत. तसेच भविष्यात कायदेशीर लढा उभा राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही शरद पवार साहेबांसोबत असे प्रतिज्ञापत्र प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून लिहून घेतले जाणार आहे” असं जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा-आम्हा कार्यकर्त्यांचा अभिमन्यू झाला आहे : पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे आणि वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे या दोन्ही विद्यमान आमदारांना आजच्या कार्यकारिणी बैठकी बाबत निरोप देण्यात आला होता. उद्या मुंबईत होणार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीला पवार साहेबांच्या प्रेमापोटी निश्चित येतील अशी अपेक्षा यावेळी प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

‘ते’ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा ताबाच घेऊ शकत नाही : प्रशांत जगताप

मुंबईत पक्ष कार्यालयावरुन वाद झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे भविष्यात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा ताबा मागितल्यास तुमची भूमिका काय राहणार या प्रश्नावर प्रशांत जगताप म्हणाले की,पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयाबाबत संबधित व्यक्ती सोबत जो करार झाला आहे त्यावर प्रशांत सुदामराव जगताप असा आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे भविष्यात कोणी ताबा करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा ताबाच घेऊ शकत नाही अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी मांडली.