प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्यातून तेल, वंगण आणि कार्बन तयार करण्याचा प्रकल्प सणसवाडी येथे सुरू झाला आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे. या प्रकल्पातून तयार होणारा वायू हवेत न सोडता तो फुग्यांमध्ये साठवला जाऊन त्यावर हवा गरम करणारी यंत्रे चालवली जाणार आहेत. रविवारी या प्रकल्पाचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
 ‘प्लाझ्मा एनर्जी’ या कंपनीने सुरू केलेल्या या प्रकल्पात तीन टन टाकाऊ कचऱ्यावर प्रक्रिया करता येणार आहे. प्लास्टिक कचऱ्याबरोबर घनकचरा, ई- कचरा, जैववैद्यकीय कचरा आणि बांधकाम कचराही दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे वातावरण प्रदूषित होत आहे. सर्व प्रकारच्या कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे,’ असे मत जावडेकर यांनी व्यक्त केले.

Story img Loader