पुणे : ओला कॅब चालकाने प्रवासी महिलेची छेड काढून अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी कॅब चालकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे : आठ वर्षांच्या मुलाला धमकावून दोन महिने अत्याचार; दत्तवाडी पोलिसांकडून तिघांना अटक

हेही वाचा – टिंडर डेटिंग ॲपवरून ओळख.. अभियंता तरुणीवर अत्याचार, मारहाण करून डोळा फोडला

याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ओला कॅब चालक श्रीराम मधुकर घारबुडे (वय ३२) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला मगरपट्टा सिटी परिसरातून सेनापती बापट रस्त्यावरील खासगी कंपनीच्या कार्यालयात निघाली होती.
प्रवासात कॅब चालक घारबुडे याने मोटारीच्या आरशाची दिशा बदलली. त्याने प्रवासी महिलेकडे एकटक पाहण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मोटारीत अश्लील वर्तन केले. महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.