लोकल मिळाल्याचे समाधान; पण नव्याची मागणी धुडकावली
पुणे-लोणावळा मार्गावर धावण्यासाठी नव्या लोकलची सातत्याने मागणी केली जात असतानाच मुंबईतील उपनगरीय वाहतुकीच्या जाळ्यात काही वर्षे वापरून झालेल्या जुन्या लोकल पुणेकरांच्या दावणीला बांधल्या जात आहेत. नुकतीच अशी एक लोकल पुण्यात दाखल झाली असून, आता या मार्गावर धावणाऱ्या सर्वच लोकल गाडय़ा बदलण्यात आल्या आहेत. लोकल जुन्या असल्या, तरी पुणेकरांसाठी त्यांची रचना नवी असल्याने काहीसे समाधान आहे. मात्र, नव्या लोकलची मागणी धुडकावून लावण्यात आल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.
पुणे-लोणावळा या उपनगरीय वाहतूक सेवेला नुकतीच चाळीस वर्षे पूर्ण झाली. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरली आहे. पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातून पुणे शहरात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, दोन्ही शहरात नोकरीच्या निमित्ताने रोजचा प्रवास करणारे चाकरमाने आणि व्यावसायिकांसाठी ही सेवा महत्त्वाची आहे. सध्या या लोकल सेवेचा लाभ एक लाखांहून अधिक प्रवासी घेतात. दिवसभरात पुणे-लोणावळा-पुणे या मार्गावर ४४ फेऱ्या केल्या जातात. त्यासाठी लोकलच्या चार रेक वापरण्यात येतात. पूर्वी धावत असलेल्या लोकलच्या चारही रेक मुंबईत वापरून जुन्या झालेल्याच होत्या. त्यानंतर पुणे-लोणावळा मार्गावर अनेक वर्षे धावल्यामुळे त्या खिळखिळ्या झाल्या होत्या. त्यामुळे पुण्यासाठी नव्या रचनेच्या आधुनिक यंत्रणा असलेल्या नव्या लोकल देण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती.
खिळखिळीत झालेल्या लोकलबाबत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने टप्प्याटप्प्याने या लोकल बदलण्यात आल्या. मात्र, त्यासाठी मुंबईत वापरलेल्याच लोकल आणण्यात आल्या. मागील वर्षभरात लोकलच्या तीन रेक बदलण्यात आल्या. आता शेवटची आणि चौथी लोकलही बदलण्यात आली असून, त्यासाठी मुंबईत अनेक वर्षे वापरलेली, पण नव्या रचनेची लोकल नुकतीच पुण्यात दाखल झाली आहे. पुणेकरांसाठी ही लोकल नवी असून, ती नव्या रचनेची असल्याचेच काहीसे समाधान आहे. मुंबईतील दमट हवामानामध्ये गाडय़ा लवकर खराब होतात. त्यामुळे वापरून काहीशा जुन्या झालेल्या या गाडय़ा पुण्यात किती काळ सेवा देऊ शकणार, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
समाधानाची बाब..!
मुंबईत वापरलेल्या जुन्या लोकल पुण्यासाठी दिल्या असल्या, तरी सीमेन्स प्रकारातील या गाडय़ांची नवी रचना आणि अधिक वेगाने धावण्याची क्षमता ही काहीशा समाधानाची बाब आहे. पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकल गाडय़ांमध्ये बसणे आणि उभे राहण्यासाठी अधिक सुटसुटीत जागा आहे. दरवाजे आणि खिडक्या मोठय़ा आहेत. डब्यांमध्ये हवा खेळती ठेवण्याची यंत्रणा आहे. पूर्वीच्या लोकल प्रतितास ८० किलोमीटर वेगाने धावू शकत होत्या. या गाडय़ा १०० किलोमीटर वेगाने धावू शकतात. या गाडय़ा सुरू होण्यास आणि थांबण्यात कमी कालावधी घेतात. विशेष म्हणजे गाडय़ांमधील ब्रेकच्या यंत्रणेतून गाडीने वापरलेल्या २० ते ३० टक्के विजेची पुनर्निर्मितीही होते. सध्या लोणावळा ते तळेगाव लोहमार्गादरम्यान अत्याधुनिक स्वयंचलित मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या गाडय़ांच्या माध्यमातून या मार्गावर वेगवान प्रवास होण्यासह गाडय़ांचे वेळापत्रक सांभाळणे शक्य होऊ शकेल.