लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : शिवाजीनगर येथील कामगार पुतळ परीसरात मुठा नदी पात्रात एका जेष्ठ महिलेचा मृतदेह आढळून आला. सुहासिनी सुधीर देसाई (वय 75, रा.विवेकानंद सोसायटी सिंहगड रस्ता ) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी शिवाजीगनर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुहासिनी यांनी संगम पुलावर धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची महिती पोलिसांनी दिली. त्या त्या संगम फुलावरून नदीपात्रात पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.

आणखी वाचा-‘पुणे कॅन्टोन्मेंट’ भाजपसाठी आव्हानात्मक; काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढत

शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसरातील मुठा नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला, गुरूवारी सायंकाळी मिळाली होती. त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रेल्वे पुलावरुन मृतदेह खाली पडल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी महिलेची पर्स मिळून आली आहे. त्यामध्ये मिळून आलेल्या आधारकार्डद्वारे महिलेची ओळख पोलिसांनी पटवलेली आहे. याबात महिलेच्या नातेवाईकांना पोलिसांनी कळवले आहे. शिवाजीनगर पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old womans dead body found in mutha river police investigation underway pune print news rbk 25 mrj