पिंपरी चिंचवड : आपलं हिंदू राष्ट्र पुढे गेलं पाहिजे. ते वाढलं पाहिजे अस आवाहन ऑलम्पिक कांस्यपदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी केलं आहे. स्वप्नील कुसाळे हे बालेवाडी- हिंजवडीतील अमोल बालवडकर यांच्या दहीहंडीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी तरुणांच्या डायट विषयी देखील आवर्जून उल्लेख करत घरातील आणि पौष्टिक जेवण करण्याच आवाहन तरुणांना केल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वप्नील कुसाळे म्हणाले, “पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवात सहभागी झालो आहे. आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. आपण सर्वजण जय श्रीराम म्हणतो, घोषणाबाजी करतो. त्या पुढे गेल्या पाहिजेत. हिंदू संस्कृती वाढली पाहिजे. आपण लहान मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, म्हणजे आपले हिंदू राष्ट्र आणखी मोठे होईल.”

हेही वाचा…Dahi Handi Celebrations In Pune : नियमभंगाचेही थरावर थर!

पुढे ते म्हणाले, “दहीहंडी सारखे खेळ खेळण्यासाठी शरीरयष्टी महत्त्वाची आहे. उंचावर जाऊन हंडी फोडणे कौतुकास्पद आहे. त्यामागे मेहनत असते. तरुणांनी चांगला आहार घेतला पाहिजे. बाहेरचे खाऊ नये. घरातील जेवण करावे, वेळेत आणि पौष्टिक खावे,” असे आवाहनही स्वप्नील यांनी केले आहे. यावेळी स्वप्नील यांचा नागरी सत्कार करून त्यांना पाच लाख रुपये देण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympic medalist swapnil kusale statement on hindu nation and nutritious diet for youth kjp 91 psg