विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वांनाच जबाबदारीने योगदान द्यावे लागणार आहे. त्यामध्ये अग्रवाल समाजाचा पुढाकार महत्त्वाचा आहे, अशी अपेक्षा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या महाराष्ट्र प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गजानन कीर्तिकर, चित्रपट अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, अग्रवाल समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाळ शरण गर्ग, प्रदेशाध्यक्ष अनुप गुप्ता, संयोजक राजेश अग्रवाल, शहराध्यक्ष ईश्वरचंद गोयल, उद्योजक पवन सराफ आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पुणे : युवकांमुळेच देश महासत्ता; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मत

बिर्ला म्हणाले, अग्रवाल समाज हा परिश्रम करणारा आणि संस्कारक्षम असणारा समाज आहे. व्यापार, उद्योगातून त्यांनी आर्थिक सुबत्ता प्राप्त केली. पण, हा समाज इथेच थांबला नाही. ज्या समाजातून धन मिळविले त्या समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून अनेक कल्याणकारी कामे केली. गरीब, सामान्य व्यक्तीच्या पाठीशी हा समाज नेहमीच उभा राहिला. सामाजिक जीवनात परिवर्तन आणण्यासाठी आपण एकत्रित येणे गरजेचे आहे. आपल्या भारत देशाला जगात सर्वात प्रगत देश बनवायचे आहे. विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी अग्रवाल समाजाने पुढाकार घ्यावा. आपण अग्रसेन महाराज यांचे वंशज आहोत. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून आपण गेले पाहिजे. उद्योग व व्यापारातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीत अग्रवाल समाजाचे योगदान मोठे आहे. स्वातंत्रलढ्यात समाजाने मोठे आंदोलन उभे करून समाजाने ब्रिटिशांच्या विरोधात एकजुटीने लढा दिला, असेही बिर्ला यांनी सांगितले.