पुणे: कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (CII) वतीने देशातील पहिल्या ‘नेक्सजेन मोबिलिटी शो’चे (NexGen mobility show) आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. डेक्कन कॉलेजच्या मैदानावर १५ व १६ डिसेंबरला हे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनातून भविष्यातील वाहन उद्योगाचा वेध घेतला जाणार आहे.

सीआयआयच्या वतीने पत्रकार परिषदेत या प्रदर्शनाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. या वेळी ‘सीआयआय डब्लूआर टास्कफोर्स ऑन फ्यूचर मोबिलिटी’चे अध्यक्ष आणि टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्सचे अध्यक्ष अरविंद गोयल, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ‘सीआयआय अर्बन मोबिलिटी शो’चे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, ‘सीआयआय डब्ल्यूआर टास्कफोर्स ऑन फ्यूचर मोबिलिटी’चे सहअध्यक्ष आणि फियाट इंडिया ऑटोमोबाईल्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खत्री आणि ‘सीआयआय डब्ल्यूआर’चे ट्रेड फेअर आणि कॉन्फरन्सेस प्रमुख सौरभ राजूरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा… सावधान! पुण्यात डोळ्याच्या साथीचे रोज ५०० पेक्षा अधिक रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशाला स्मार्ट आणि शाश्वत गतिशीलतेच्या दिशेने नेण्याचा हेतू या प्रदर्शनामागे आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, नवउद्योजक, धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. वाहन उद्योग वेगाने विकसित होत आहे. भविष्यातील वाहन उद्योगाचे चित्र अतिशय वेगळे असणार आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये भविष्यातील गतिशीलतेचे विविध पैलू, इलेक्ट्रिक वाहने, अत्याधुनिक तंत्रज्ञान, बॅटरी तंत्रज्ञान आणि चार्जिंग सुविधा, पर्यायी इंधन, अद्ययावत आणि शाश्वत पायाभूत सुविधा आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या प्रदर्शनात वाहन उद्योग, इंधनाचे भविष्य आणि शहरी गतिशीलता या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.