लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : नववर्षाच्या पहिल्या दिवशी शहर आणि उपनगरातील नागरिकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गर्दी केली. मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवल्याने मध्यभागातील वाहतुकीचा बोजवारा उडाला. शिवाजी रस्त्यालगतच्या गल्ली बोळात भाविकांनी बेशिस्तपणे वाहने लावल्याने कोंडीत भर पडली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गर्दीत अडकून पडावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला.

आणखी वाचा-पिंपरी : मराठा समाजाचे साखळी उपोषण २५ दिवसांनंतर स्थगित

देवदर्शन करून नववर्षाचे स्वागत करण्याच्या परंपरेनुसार सोमवारी पहाटेपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी आपली दुचाकी वाहने जवळपासच्या रस्त्यांवर आणि गल्लीबोळात लावली होती. आधीच अरुंद असलेले रस्ते वाहनांच्या गर्दीने वाहतुकीसाठी उरलेच नाहीत. परिणामी शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक आणि मध्यवर्ती भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नववर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी गर्दी होत असल्याने वाहतूक पोलिसांनी मध्यभागातील शिवाजी रस्ता, अप्पा बळवंत चौक ते बुधवार पेठेतील हुतात्मा रस्ता, गणेश रस्ता वाहतुकीस बंद ठेवला होता. सोमवारी सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. भाविकांनी त्यांच्या मोटारी रस्त्यावर बेशिस्तपणे लावल्या होत्या. दुचाकी गल्ली बोळात लावल्याने वाहनांना वाट काढणे अवघड झाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On first day of new year shivaji road was closed for traffic resulting in traffic jam in central part pune print news rbk 25 mrj
Show comments