पुणे : कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी २०२५ रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी (३१ डिसेंबर) दुपारी दोन वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी उपस्थित राहणार असल्याने वाहतूक बदल करण्यात येणार आहे. वाहतूक बदलाबाबतचे माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार असून, वाहनचालकांनी सहकार्य करावे , असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक बदल एक जानेवारी २०२५ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरुन वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे जावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरुन विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड,मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे. मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुरमार्गे नगरकडे जावे.

तमाच्या तळाशी दिवे लागले रे
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Banke Bihari Mandir video AC water as charnamrit
चरणामृत समजून भाविक पितायत एसीचे पाणी; बांके बिहारी मंदिरातील धक्कादायक VIDEO
Administration ready for Koregaon Bhima greeting ceremony
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, कसे आहे नियोजन ?
prajakta mali reaction after suresh dhas apology
सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “अत्यंत मोठ्या मनाने माफी मागितल्यामुळे…”
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Blog : आवर्जून वाचावे असे ‘१ जानेवारी, १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’

हेही वाचा…पिंपरी : घोरावडेश्वर डोंगर परिसरात निसर्ग मित्र, वनपाल घालणार गस्त; वाचा काय आहे कारण?

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरुकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या पुलावरुन केवळ अनुनायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जडवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहने लावण्याची ठिकाणे

विजयस्थंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुनायांसाठी प्रशासनाने वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहेत. वाहने लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे- लोणीकंद येथील आपले घर, बौद्ध वस्ती, मोनिका हाॅटेलशेजारी, ओमसाई हाॅटेलच्या पाठीमागे, तुळापूर फाटा स्टफ कंपनीशेजारी, तुळापूर रस्ता वाय पाॅईंट, हाॅटेल गणेश मिसळजवळ, तुळापूर रस्ता हाॅटेल शेतकरी मिसळ शेजारी, निसर्ग लाॅज शेजारी, फुलगाव सैनिकी शाळा मैदान, थेऊर रस्ता, सोमवंशी ॲकडमी शेजारी, खंडोबाचा माळ, पेरणे फाटा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा

हेही वाचा…पिंपरी : स्थापत्यविषयक कामांमुळे यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईला अडथळा; महापालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

अवजड वाहनांना बंदी

शहरात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. लोणी काळभोर परिसरातील थेऊर फाटा, खडकीतील हॅरीस पूल, विश्रांतवाडीतील बोपखेल फाटा, बाणेरमधीमल राधा चौक, सिंहगड रस्ता भागातील नवले पूल, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक, फुरसुंगीत मंतरवाडी फाटा, मरकळ पुल येथून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Story img Loader