पुणे: जंगली महाराज रस्त्यावर मोटारचालकाकडे बतावणी करुन चोरट्यांनी लॅपटाॅप लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका मोटारचालकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कर्वेनगर भागात राहायला आहे. जंगली महाराज रस्त्यावर ते कामानिमित्त आले होते.
त्यांनी मोटार जंगली महाराज रस्त्यावर एका दुकानासमोर थांबविली. मोटारचालक मोटारीत होते. त्या वेळी एक चोरटा मोटारीजवळ आला आणि त्याने मोटारीच्या खिडकीची काच वाजविली. मोटारीसमोर पैसे पडल्याची बतावणी चोरट्याने केली.
हेही वाचा… दिवाकरांची ‘रिकामी काडेपेटी’ पोलिश रंगमंचावर! पोलंडमधील पोझनान शहरात दोन प्रयोग
मोटारचालक मोटारीतून खाली उतरले. त्यांचे लक्ष नसल्याने संधी साधून चोरट्यांनी लॅपटाॅप, पेनड्राइव्ह ठेवलेली पिशवी मोटारीतून लांबविली. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे तपास करत आहेत.