पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळील बोरघाटात शुक्रवारी पहाटे वाहनांची १५ किलोमीटरची रांग लागली होती. अवजड वाहने सोडल्याने झालेल्या वाहतूक कोंडीने सारेच त्रस्त झाले होते. या मार्गावर रात्रीच्या वेळी लेनची शिस्त पाळली गेली नाही. अनेक अवजड वाहने मार्गावर आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. अनेक ट्रक आणि चारचाकी वाहने जागेवरच थांबली होती.
हेही वाचा : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण
या वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका आणि मंत्र्याची गाडी अडकून पडली होती. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी यंत्रणेला मोठी कसरत करावी लागली. मंत्र्याची गाडी विरुद्ध दिशेने वळवून जुन्या पुणे-मुंबई मार्गाने नेण्यात आली. बोरघाट कक्षाला संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक असला तरी त्यावर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नव्हता.