पुणे : यंदा दसऱ्यानिमित्त वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून आला. दसऱ्याच्या आधीच्या नऊ दिवसांत नागरिकांनी नऊ हजार ३०५ वाहनांची खरेदी केली. यंदा दुचाकी विक्रीत वाढ झाली असून, मोटारींच्या विक्रीत घट झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दसऱ्याचा मुहूर्त डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी वाहनखरेदी केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील आकडेवारीनुसार, १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधी नऊ हजार ३०५ वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षीपेक्षा ही संख्या सुमारे दोनशेने अधिक आहे. मागील वर्षी दसऱ्याच्या आधी २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत नऊ हजार ९१ वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा दुचाकींची विक्री सर्वाधिक असून, ती पाच हजार ५७८ आहे. त्या खालोखाल मोटारींची विक्री दोन हजार ९१० आहे. मालवाहतूक वाहने २७५, रिक्षा २३८, बस ३४ आणि टॅक्सी २७० अशी विक्री झाली.

हेही वाचा >>>पिंपरी: छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी घेणारा व्यायामशाळा प्रशिक्षक अटकेत

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दसऱ्याच्या आधी दुचाकींच्या नोंदणीत सुमारे दोनशेने वाढ झाली आहे. या वेळी मोटारींची नोंदणी सुमारे शंभरने, तर मालमोटारींची नोंदणी सुमारे पन्नासने कमी झाली आहे. रिक्षा, टॅक्सी आणि बसच्या नोंदणीत या वेळी वाढ झाली आहे, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

ई-मोटारीला वाढती मागणी

मागील वर्षी दसऱ्याच्या तोंडावर ५१ ई-मोटारींची विक्री झाली होती. यंदा ही विक्री वाढून ७८ वर पोहोचली. मागील वर्षी ई-दुचाकींची विक्री ६६४ होती. त्यात यंदा घट होऊन ती ५८४ वर आली आहे. एकूण ई-वाहनांच्या विक्रीत घट होऊन ती ७२१ वरून ६६९ वर आली आहे.