कोजागरी पोर्णिमेनिमित्त शहरातील सर्व उद्याने आज रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे.
सारसबाग, जंगली महाराज रस्त्यावरील श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यान, मॉडेल कॉलनी परिसरातील चित्तरंजन वाटिका उद्यान, कोथरूड येथील थोरात उद्यान, सोमवार पेठेतील शाहू उद्यान, कमला नेहरू उद्यान, हडपसर भागातील लोहिया उद्यान, सहकार नगरमधील काकासाहेब गाडगीळ उद्यान याप्रमुख उद्यानांसह शहराच्या विविध भागातील अन्य लहान उद्याने खुली ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘ई-चावडी’द्वारे घरबसल्या कर भरण्याची सुविधा

कोजागरी पोर्णिमेनिमित्ताने नागरिकांकडून उद्यानामध्ये विविध कार्यक्रम साजरे केले जातात. सायंकाळपासून उद्यानात नागरिकांची गर्दी होते. विविध संस्था, संघटनांकडूनही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने रोज आठ वाजता बंद होणारी उद्याने कोजागरी पोर्णिमेसाठी रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of kojagari the parks in pune are open till 10 tonight pune print news amy