‘मर्द आम्ही मराठे खरे, दुष्मनांना भरे कापरे…’ या गीताचे समूहगान करीत सहा शाळांतील एक हजार विद्यार्थ्यांनी आज (शुक्रवार) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शंभराव्या जन्मदिनानिमित्त अनोखी मानवंदना दिली. पुरंदरे यांचा जन्म झालेल्या शुक्रवार पेठेतील शिर्के वाडा येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 इतिहास प्रेमी मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात शिवचरित्र प्रसारासाठी अवघे जीवन समर्पित करणाऱ्या शिवशाहिरांच्या जन्मस्थानाला गीतांतून मानवंदना देण्याची संधी शालेय विद्यार्थ्यांना मिळाली. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पेरुगेट भावे प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी, अहिल्यादेवी, नू. म. वि. मुलांची आणि मुलींची प्रशाला या शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला.

थोरले बाजीराव पेशवे यांचे वारसदार पुष्कर पेशवे, देवदत्त बलकवडे, राजाभाऊ टिपरे, आनंद सराफ, शिरीष मोहिते, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांच्या उपस्थितीत जन्मस्थान वास्तूवरील नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of shivshahir babasaheb purandares 100th birthday1000 students performed a group song to pay tribute to him pune print news msr