पिंपरी येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीने फूल विक्रीचा परवाना दिलेल्या फुलविक्रेत्यांना रस्त्यावर बसून फुलांची विक्री करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून येथील फूलबाजाराच्या जागेचा प्रश्न रखडला असून महापालिका आयुक्त आणि महापौरांकडून जागा उपलब्ध करुन देण्याचे फक्त आश्वासन दिले जाते. रस्त्यावरील फूलबाजारामुळे पिंपरीतील मुख्य बाजारपेठेमध्ये सकाळच्या वेळी मोठय़ा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.तसेच शेतकऱ्यांच्या मालाचेही नुकसान मोठय़ा प्रमाणात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिंपरी कृषी उत्पन्न उप बाजार समितीने फूल विक्रेत्यांना विक्रीचे परवाने दिले आहेत. तसचे विक्रेत्यांकडून करही वसूल केला जातो. मात्र, फूलविक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे विक्रेत्यांना रस्त्यावर बसून फुलांची विक्री करावी लागते. पिंपरी चिंचवड शहराच्या लगतच्या खेडय़ातून विविध प्रकारची फुले पिंपरीमध्ये विक्रीसाठी येतात. पहाटेच्या वेळी फूलबाजार सुरु होतो. हक्काची जागा नसल्यामुळे फूल विक्रेत्यांना सकाळी दहा वाजताच फूलबाजार बंद करावा लागतो. दहा वाजता फूलबाजार बंद केला नाही तर तिथे असलेले दुकानदार दुकानाच्या समोर बसू देत नाहीत. बाजार समितीचा कर भरुनही फूलविक्रेत्यांचे जागेअभावी हाल सुरु आहेत. बाजार कमी वेळेत बंद करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचा माल विक्रेत्यांकडून पडेल भावात विक्री करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

शिल्लक राहिलेल्या फुलांचा माल ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना तो माल परत घरी घेऊन जावा लागतो किंवा रस्त्यावर फेकावा लागतो.जागा उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी आणि विक्रेते दोघेही अडचणीत सापडले आहेत. गतवर्षी याच महिन्यात तत्कालीन महापौर नितीन काळजे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती दिलीप खैरे यांनी फूलबाजाराच्या जागेची पाहणी केली होती. पिंपरीतील क्रोमा मॉलच्या शेजारी फूलविक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्या वेळी देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर जागेसंदर्भात कोणतीही प्रक्रिया झाली नाही.