पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आज भीषण अपघात झाला असून सुदैवाने यात जीविहितहानी झालेली नाही. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या दुभाजकाला ( डिव्हायडर ) धडकली. यावेळी दुभाजकाला एक भाग कारच्या आरपार शिरला. दैव बलवत्तर असल्याने कारमधील तिघे जण सुखरूप बचावले असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास सोमाटने एक्झिटला झाला. निल कुसुम आका (चालक), सारा अमिताभ मुजावर आणि इवा अमिताभ मुजावर अशी कार मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नाव आहेत.हे सर्व जण मुंबईतील रहिवासी आहेत.

हेही वाचा… पुणे: महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाला जेजुरीतून अटक

Mumbai western expressway loksatta news
मुंबई : दुभाजक ओलांडून कारची बसला धडक; पश्चिम द्रुतगतीमार्गावर अपघात, कार चालकाचा मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
is the police protecting reckless drivers
बेदरकार वाहनचालकांना पोलिसांचे अभय?
Traffic police take action against vehicles engaged in illegal traffic in Vasai Virar city
बेकायदेशीर वाहनांवरील कारवाई जोरात, वाहनचालकांची पळापळ, नागरिकांना दिलासा
thane drunk driver hit vehicles
घोडबंदर मार्गावर मद्यपी वाहन चालकाची तीन ते चार वाहनांना धडक, कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Navi Mumbai year 2024 road accidents navi mumbai police
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान

मुंबईहुन पुण्याचे दिशेने प्रवास करणाऱ्या कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. द्रुतगती मार्गावरून सोमाटने एक्झिट येथून देहूरोडच्या रस्त्याला वळत असताना कारवरील ताबा सुटून कार थेट पत्राच्या दुभाजकाला ला धडकली आणि कारच्या आरपार दुभाजकाचा पत्रा शिरला. अधिक तपास शिरगाव पोलिस करत आहेत.

Story img Loader