इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) मराठा समाजाचा समावेश करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी गुरुवारी (४ एप्रिल) मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण महामोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे शहर, िपपरी-चिंचवड आणि जिल्हय़ातून संभाजी ब्रिगेडचे सुमारे पाच हजार कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. युवराज संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अॅड. शशिकांत पवार, किसनराव वरखिंडे, प्रतापसिंह जाधव, आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, विकास पासलकर, प्रदीप सोळुंके, मनोज आखरे सहभागी होणार आहेत, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अजय भोसले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा आरक्षणासाठी गुरुवारी मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन
इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) मराठा समाजाचा समावेश करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी गुरुवारी (४ एप्रिल) मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण महामोर्चा काढण्यात येणार आहे
First published on: 02-04-2013 at 01:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On thursday mega march in mumbai for maratha reservation