लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून सुरक्षारक्षकाने साथीदाराच्या मदतीने दीड किलो सोन्याचे दागिने आणि दहा लाख रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत

या प्रकरणी रखवालदार झंकार बहाद्दुर सौद (रा. नेपाळ) याच्यासह दोन साथीदारांच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रीतम राजेंद्र मंडलेचा (रा. राजव्हिला, मंगलवाडी, सेनापती बापट रस्ता) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंडलेचा बांधकाम व्यावसायिक आहे. मंडलेचा यांच्या बंगल्याची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचे काम एका सिक्युरिटी एजन्सीला देण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून झंकार सौद मंडलेचा यांच्या बंगल्यात सुरक्षारक्षक म्हणून काम पाहत होता. मंडलेचा कुटुंबीय बाहेर जेवण करण्यासाठी गेले होते. सुरक्षारक्षक सौद याने साथीदारांना बोलावून घेतले.

बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून सौद आणि दोन साथीदारांनी बंगल्यात प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून साडेदहा लाखांची रोकड, पाच अंगठ्या, सोन्याचे कडे, चार सोनसाखळ्या, दोन ब्रेसलेट, चार बांगड्या, सोन्याची बिस्किटे, कुंदनहार, हिरेजडीत दागिने असा ७८ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज लांबवून सौद आणि साथीदार पसार झाले. मंडलेचा कुटुंबीय घरी परल्यानंतर शयनगृहातील कपाट उचकटल्याचे आढळून आले. कपाटातून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मंडलेचा यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी घटनास्थळी धाव घेतली.