शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मित्राचा मृतदेह पंख्याला लटकावून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या एकाला काेथरूड पाेलिसांनी अटक केली.परेश शंकर कंधारे ( वय २८, रा. स्मिता हाईटस, लाेकमान्य काॅलनी, काेथरूड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वसंत अवसरे ( वय २८, रा. शास्त्रीनगर) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कुंदन बापू अडसूळ (वय ३६, रा. नवीन डीपी रस्ता, कोथरूड) याने काेथरूड पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे: ‘ट्रॅफिक बूथ’मुळे वाहतुकीचा खोळंबा

परेश हा कुंदन अडसूळ याचा मामेभाऊ आहे. परेश आणि वसंत एका काॅलसेंटरमध्ये काम करत होते. आराेपी वसंत जेवण करण्यासाठी मंगळवारी (२० डिसेंबर) दुपारी परेशच्या घरी आला होता. त्या वेळी परेशने वसंतला शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर वसंतने परेशचा गळा दाबून खून केला आणि त्याचा मृतदेह पंख्याला लटकाविला. परेशने आत्महत्या केल्याचा बनाव त्याने रचला. या घटनेची माहिती काेथरूड पाेलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.परेशच्या गळ्याजवळ व्रण आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. वैद्यकीय तपासणीत परेशचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपी वसंत याला अटक करण्यात आली, अशी माहिती कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.