पुणे : लोणी काळभोर परिसरात गांजा विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून सहा किलो गांजा आणि दुचाकी असा एक लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.चंद्रकांत सुरेश पवार (वय २१, सध्या रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. तिंत्रज, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथक लोणी काळभोर भागात गस्त घालत होते. त्या वेळी एक जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी सापळा लावून पवार याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली असता, पिशवीत गांजा सापडला. पवार याच्याकडून दुचाकी आणि सहा किलो १०७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, मनोज साळुंके, विशाल दळवी, मारुती पारधी, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, राहुल जोशी आदींनी ही कारवाई केली.