पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी सिंहगड रस्ता परिसरात पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक काडतुूस जप्त करण्यात आले. वैभव विजय वाल्हेकर (वय २९,रा. कामथडी, ता. भोर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नऱ्हे भागात एक जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील गस्त घालणारे पोलीस कर्मचारी अमोल तांबे आणि माने यांना मिळाली.

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून वाल्हेकरला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली. पिशवीत देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. वाल्हेकर पिस्तुलाची विक्री कोणाला करणार होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त राजेंद्र पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक जयंत राजुरकर, सहायक निरीक्षक राहुल यादव, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, शंकर कुंभार, रवींद्र अहिरे, अमोल तांबे, माने आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader