मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. ब्राह्मण समाजाने कधीही स्वतःला कमी लेखू नये, ब्राह्मण एक असला तरीही लाखाला भारी आहे असे रासपचे नेते महादेव जानकर यांनी म्हटले आहे. या देशात ज्याला ब्राह्मणांचा हात लागतो तो हिस्ट्री मेकर होतो. महात्मा गांधी यांचे गुरु गोपाळकृष्ण गोखले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षक ब्राह्मण होते. महात्मा फुलेंना शाळेसाठी वाडा देणारेही ब्राह्मणच होते असंही जानकर यांनी म्हटलं आहे. ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात माहेदव जानकर यांना पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. शिवाय ब्राह्मण ही जात किंवा धर्म नाही तर ती एक व्यवस्था आहे असंही म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भविष्यात पंतप्रधान होतील असंही भाकित महादेव जानकर यांनी वर्तवलं. ब्राह्मणांमुळे चहा विकणारा मुलगा पंतप्रधान झाला. ब्राह्मणांनी राजकारणात यावं आणि आरक्षण मागावं असाही सल्ला जानकर यांनी दिला. या देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता कायम राखण्याचं काम ब्राह्मण समाजानेच केलं आहे. आज ब्राह्मण समाजात गरीबी आहे, ब्राह्मणांनी या देशात आरक्षण मागितलं पाहिजे. या समाजाची व्यथा मांडायची कोणी? असाही प्रश्न महादेव जानकरांनी उपस्थित केला. या समाजामुळे चहा विकणारा मुलगा पंतप्रधान पंतप्रधान झाला. माझ्यासारख्या धनगराच्या मुलाला मंत्रिपद मिळालं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण मुख्यमंत्री असूनही वंचितांसाठी काम करत आहेत. सर्व समाज घटकांसाठी ते काम करत आहेत. पुढील काळात ते देशाचे पंतप्रधान होतील असंही भाकित जानकर यांनी वर्तवलं.

ब्राह्मणांविरोधात कोणीही बोलत असेल तरीही काळजी करू नका. मी तुमच्यासोबत आहे. हत्ती आपली चाल चालत असतो, भुंकणारे भुंकत असतात असंही जानकर यांनी म्हटलं आहे. ब्राह्मण समाज आहा दाता समाज आहे. ब्राह्मणांनी प्रोत्साहन दिल्याने अनेक माणसांचं आयुष्य यशस्वी झालं आहे. ब्राह्मण सुधारला तर देश सुधारेल, या समाजातील मान्यवरांनी समाजाला मदत केली पाहिजे असं सांगत ब्राह्मण समाजाला राजकारणात येण्याचं आवाहनही जानकर यांनी केलं.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One brahman is like lakh brahmans says mahadev jankar
Show comments