पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात करोना रुग्णांची संख्या वाढताना पुण्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या पुणे शहर आणि जिल्ह्यात ७११ रुग्णांवर उपचार सुरू असून, ३९ रुग्णांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात ३९ रुग्णांवर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी सात रुग्णांना प्राणवायू, तर चार रुग्णांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. उर्वरित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे, सहव्याधीग्रस्त आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.