शिरूर:  निमोणे , ता . शिरुर येथे  बोलेरोने दिलेल्या धडकेत युवक मृत्युमुखी पडला तर एक जण जखमी झाला  . शंतनु सोमनाथ जाधव वय (१८ वर्ष ) रा. निमोणे ता. शिरूर जि. पुणे असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे . तर सानिका सचिन कांबळे ( वय -१६  वर्ष)  रा. गारमळा, मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे  या जखमी झाल्या.याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  सोमनाथ दादा जाधव यांनी फिर्याद दिली असून  अज्ञात बोलेरो गाडी वरील अज्ञात चालकाचा  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . १४ फेबृवारी २०२५  रोजी हा अपघात  निमोणे ता. शिरूर येथे झाला.

सोमनाथ जाधव हे  स्कुटी गाड़ी क्रमांक. एम. एच. १२  यु. वाय.०९५१  वरून मुलगा शंतनु व साडुची मुलगी सानिका कांबळे  यांना गुनाट येथुन आणण्यासाठी निमोणे ते गुनाट रोडने जात असताना निमोणे येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ गेल्यावर शंतनु व सानिका असे दोघे रोडच्या  कडेने निमोणेकडे बोलत येताना दिसल्यावर जाधव नायरा पेट्रोल पंपांचे जवळ रोडचे पलीकडे बाजुस गाडी लावुन थांबले होते . शंतनू व सानिका  स्कुटी गाडीजवळ आल्या नंतर  जाधव  लघुशंकेला बाजुला गेल्यावर  गुनाट बाजुकडुन निमोणे बाजुकडे जाणा-या रोडने नविन मॉडेलच्या बोलेरो गाडी वरील अज्ञात चालकाने शंतनु सोमनाथ जाधव वय १८ वर्ष रा. निमोणे ता. शिरूर जि. पुणे व   सानिका सचिन कांबळे वय १६  वर्ष रा. गारमळा, मांडगण फराटा ता. शिरूर जि. पुणे यांना जोरात धड़क  दिली .त्यात गंभीर जखमी होवून  शंतनु मरण पावला तर सानिका कांबळे जखमी झाल्या.अपघातानंतर वाहनचालक पळून गेला.पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक झेंडगे करीत आहे .

Story img Loader