पुण्यातील विमाननगर परिसरात बुधवारी दुपारी अंगावर वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला. विमाननगर परिसरातील सिम्बायोसिस विधी महाविद्यालयाजवळ ही दुर्घटना घडली. अक्षय विजय भालशंकर (१८) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून, संतोष चांदणे जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय मोबाईल बघत असताना वीज पडल्याने तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. संतोषवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये बुधवारी दुपारी काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यावेळीच ही दुर्घटना घडली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-03-2016 at 19:32 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One dead in pune due to lightning