पुणे : प्रसूतीनंतर महिलांमध्ये आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. आता एका नव्या संशोधनातून एक तृतीयांश महिलांना प्रसूतीनंतर दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याची बाब उघड झाली आहे. जगभरात दरवर्षी सुमारे चार कोटी महिलांना हा त्रास सुरू होत असल्याची धक्कादायकही आकडेवारीही संशोधनातून समोर आली आहे.

लॅन्सेट ग्लोबल हेल्थमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या संशोधनाबद्दल माहिती जाहीर केली आहे. यानुसार, प्रसूतीनंतर महिलांमध्ये काही महिने अथवा काही वर्षे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यात प्रामुख्याने शारीरिक संबंधांवेळी वेदना होण्याचा त्रास ३५ टक्के महिलांना जाणवतो. त्याखालोखाल ३२ टक्के जणींना पाठदुखीची समस्या सुरू होते. मलविसर्जनावर नियंत्रण न राहण्याची समस्या १९ टक्के महिलांमध्ये जाणवते. मूत्रविसर्जनावर नियंत्रण राहण्याची समस्या ८ ते ३१ टक्के महिलांमध्ये आढळते. याचबरोबर इतर समस्यांमध्ये तणाव ९ ते २४ टक्के, नैराश्य ११ ते १७ टक्के, विटप वेदना ११ टक्के, मूल जन्माला घालण्याची भीती ६ ते १५ टक्के, वंध्यत्व ११ टक्के असे प्रमाण आहे.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

आणखी वाचा-कसबा पेठेत जुन्या लाकडी वाड्याला आग; सुदैवाने जिवीतहानी नाही

या समस्या टाळण्यासाठी प्रसूतीवेळी योग्य काळजी घेण्याची गरज संशोधनात अधोरेखित केली आहे. आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात नसलेल्या भागातील महिलांना या समस्यांचा सर्वाधिक सामना करावा लागतो. प्रसूतीच्या काळात महिलेची योग्य काळजी आणि प्रसूतीनंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास यातील अनेक समस्या कमी होऊ शकतात. कारण प्रसूतीच्या काळात गुंतागुंत झाल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम महिलेच्या आरोग्यावर दिसून येतात, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

अनेक महिलांना प्रसूतीनंतर दैनंदिन जीवनात त्रासदायक ठरतील अशा अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचतात. असे असूनही याबद्दल फारशी चर्चा होताना दिसत नाही. -डॉ. पास्कल अलॉटी, संचालक, जागतिक आरोग्य संघटना

आणखी वाचा-शाळा सुरु करण्याच्या आमिषाने एक कोटी १७ लाखांची फसवणूक; न्यायालयाच्या आदेशाने प्राचार्यांसह तिघांवर गुन्हा

मातामृत्यू कमी करण्यात १२१ देशांना अपयश

जगभरात अनेक देशांमध्ये आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. याचबरोबर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांचाही महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मागील दोन दशकांत जगभरातील १८५ पैकी तब्बल १२१ देशांना मातामृत्यू प्रमाण कमी करण्यात अपयश आल्याचे वास्तवही संशोधनातून मांडण्यात आले आहे.