पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या मतदारयादी अद्ययावतीकरण कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली.

प्रारूप यादीवर नागरिकांकडून दाखल दावे, हरकती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून २९ ऑगस्टपर्यंत निकाली काढले जातील. दावे, हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत जिल्ह्यात १०, ११, १७ आणि १८ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दहा दिवस पूर्वीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येईल. जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदारयादी अद्ययावतीकरण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रावर मतदारांची संख्या समान करण्यासाठी जिल्ह्यातील ६६२ मतदान केंद्रावर काही मतदारांच्या मतदान केंद्रात बदल होणार आहे. मतदारांना त्याच इमारतीतील दुसऱ्या मतदान खोलीत मतदान करता येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.

Buldhana Assembly Election
बुलढाणा: युतीत आलबेल, आघाडीत रस्सीखेच; विधानसभा निवडणुकीसाठी…
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Thackeray Group, Sushma Andhare, Vadgaon Sheri assembly, Pune, Assembly Elections, Flexes, Uddhav Balasaheb Thackeray, Shiv Sena,
सुषमा अंधारे यांना ‘या’ मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून पुण्यात लागले फ्लेक्स
Rebellion in the Mahavikas Aghadi in Junnar Constituency of the District in the upcoming Assembly Elections 2024 pune news
जुन्नरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी? ‘सांगली पॅटर्न’ राबविण्याचे विश्वजीत कदम यांचे संकेत
Chief Minister Eknath Shindes private secretary Balaji Khatgaonkar preparing to contest the Assembly
मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विधानसभा लढण्याच्या तयारीत!
Ajit pawar and Jay Pawar
Baramati Jay Pawar: ‘बारामतीमधून निवडणूक लढण्यात रस नाही’, मुलगा जय पवारच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचे मोठं विधान
chairmanship of ladki bahin scheme review committee hand over to mlas of ruling party in thane district
लाडकी बहीण’ योजनेत सत्ताधारी आमदारांचीच वर्णी
Will work for Kisan Kathore in Vidhana Sabha says former minister Kapil Patil
“विधानसभेला किसन कथोरेंचे काम करणार”, माजी मंत्री कपिल पाटलांचा नरमाईचा सूर; “मागे कुणी काय केले ते गौण…”

हेही वाचा >>> पुणेकरांनो, आता खड्ड्यांच्या तक्रारींचा ‘पाऊस’ पाडा! तक्रार करण्यासाठी महापालिकेची विशेष व्यवस्था; १२२४ खड्ड्यांची दुरुस्ती

प्रारूप यादीनुसार शहरासह जिल्ह्याची मतदारसंख्या तब्बल ८४.३९ लाखांवर गेली आहे. त्यापैकी ४४ लाख ३ हजार ३४४ पुरुष, ४० लाख ३५ हजार ६४० महिला आणि ७४५ तृतीयपंथीय मतदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक लाख मतदार वाढले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुणे जिल्ह्याची मतदारसंख्या ही ८३ लाख ३८ हजार ७४७ एवढी होती. विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप यादीनुसार जिल्ह्याची मतदारसंख्या ही ८४ लाख ३९ हजार ७२९ झाली आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल एक लाख ९८२ मतदार नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रारूप मतदार यादीत जिल्ह्यात ८४१७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

मतदारयादीत नाव कसे शोधाल? मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ ही माहिती भरल्यानंतर समजेल. हे संकेतस्थळ किंवा वोटर्स हेल्पलाइन उपयोजनवर मतदार नावनोंदणी, वगळणीचे अर्ज ऑनलाइन भरण्याची सुविधा आहे.